Ad will apear here
Next
देशातील पहिली संपूर्ण इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही दाखल
नितीन गडकरींनी घेतली ‘एमजी’च्या ‘झेडएस ईव्ही’ कारची टेस्ट राइड
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संपूर्ण इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही ‘एमजी झेडएस ईव्ही’ चालवून पाहिली.

नवी दिल्ली : ‘वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यात आणि जीवाश्म इंधनावरील देशाची अवलंबिता कमी करण्यात विद्युत वाहनांचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार महत्त्वाची भूमिका बजावेल,’ असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. भारतात जोडणी झालेली ‘एमजी झेडएस ईव्ही’ ही पहिली संपूर्ण इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही नवी दिल्ली येथे सादर करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. ही नवी अत्याधुनिक एसयूव्ही गडकरी यांनी स्वतः चालवून  पाहिली. 

‘एमजी मोटार इंडियासारख्या खासगी कंपन्या देशात इलेक्ट्रिक वाहनांचे चलन वाढवण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांना मदत करीत आहेत ही चांगली बाब आहे,’  असे त्यांनी या वेळी नमूद केले.

एमजी (मॉरिस गॅरेज) मोटार इंडियाने ‘झेडएस ईव्ही’ ही पहिली संपूर्ण इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही दाखल केली आहे. भारतातील ही पहिली संपूर्ण इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही असल्याचा कंपनीचा दावा आहे. ‘झेडएस ईव्ही’ ग्राहकांच्या गरजा भागवण्यासाठी आपल्या मल्टी स्टेप चार्जिंग इकोसिस्टमच्या उभारणीसाठी एमजी मोटार इंडियाने विविध जागतिक आणि स्थानिक कंपन्यांशी भागीदारी केली आहे. प्रत्येक झेडएस ईव्हीसोबत एक ऑन बोर्ड केबल असते, ज्याने कोठेही चार्जिंग करता येऊ  शकते, तर एसी फास्ट चार्जरद्वारे घरी, कार्यालयातही चार्जिंग करता येते. 

ही कंपनी काही निवडक एमजी शोरूम्सवर एक डीसी सुपर-फास्ट चार्जिंग नेटवर्कदेखील उभारत असून, निवडक सॅटेलाइट शहरांत मुख्य मार्गावर एमजी डीलरशिप्समध्ये एक विस्तारित चार्जिंग नेटवर्क तयार करण्याची त्यांची योजना आहे. सुपर-फास्ट डीसी चार्जर्समार्फत (५० केडब्ल्यू) ‘झेडएस ईव्ही’ची बॅटरी ५० मिनिटांत ८० टक्के चार्ज होऊ शकते, तर घरी बसवलेल्या एसी फास्ट चार्जर्सद्वारे पूर्ण चार्जिंग करण्यासाठी सहा ते आठ तास लागू शकतात.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZJHCH
Similar Posts
डॉ. सायरस पूनावाला यांना बिल गेट्स यांच्या हस्ते ‘आयसीएमआर’ पुरस्कार प्रदान पुणे : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना नुकताच प्रतिष्ठित ‘आयसीएमआर जीवनगौरव पुरस्कार’ बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
‘किर्लोस्कर’ला सर्वोत्कृष्ट व्यवसाय पुरस्कार पुणे : किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड कंपनीला यंदाचा ‘सीआयआय एक्झिम बँक सर्वोत्कृष्ट व्यवसाय’ पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार पटकावणारी डीझेल इंजिन, जनरेटर्स क्षेत्रातील ही पहिली कंपनी आहे. बेंगळुरू इथं नुकत्याच झालेल्या २७ व्या राष्ट्रीय गुणवत्ता परिषदेत ‘केओइएल’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर
काँक्रीटची मजबुती मोजणारा भारतीय बनावटीचा पहिला ‘मॅच्युरिटी मीटर’ विकसित पुणे : बांधकामात वापरल्या जाणाऱ्या काँक्रीटची मजबुती मोजण्यासाठी ‘पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग रीसर्च फाउंडेशन’ने (पीसीईआरएफ) संपूर्णतः भारतीय बनावटीचे ‘मॅच्युरिटी मीटर’ हे उपकरण देशात प्रथमतः विकसित केले आहे. या मॅच्युरिटी मीटरची किंमत सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या परदेशी मॅच्युरिटी मीटरच्या किमतीच्या केवळ ३५ ते ४० टक्के इतकीच आहे
‘क्विकहील’ला ‘डीएससीआय’तर्फे पुरस्कार मुंबई : क्विकहील टेक्नॉलॉजीज लिमिटेडला ‘डीएससीआय एक्सलन्स अॅवॉर्ड २०१९’मध्ये नासकॉमच्या डेटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे (डीएससीआय) ‘सायबर सिक्युरिटी प्रॉडक्ट पायोनियर इन इंडिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language